spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना ? महाराष्ट्रातील राजकारण कोणतं वळण घेणार ?

बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना होणार, मुंबईत पोहोचल्यावर सुरु असलेल्या राजकारणाला नक्की कोणतं वळण मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत.

मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे हे १२ आमदारांसह आधी सुरत ला त्यानंतर गुवाहाटीला रवाना झाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करावी असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर एकामागून एक असे ४२ आमदार गुवाहाटीला पोहोचले. काही आमदार गेले काही परत ही आले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर आपली भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह कुटुंब वर्षा निवास्थान सोडून पुन्हा मातोश्रीवर परतले.

गेल्या २ – ३ दिवसात राजकीय वर्तुळात अनेक उलथापालथ झाली. अखेर आज शुक्रवारी बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना होणार असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. एकदा नेते एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचल्यावर सुरु असलेल्या राजकारणाला नक्की कोणतं वळण मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी सोडलं असल्याची माहिती मिळत आहे.

यापूर्वी काँग्रेस नेते भुपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदेंना पात्र लिहून गुवाहाटी सोडण्याची विनंती केली आहे. आसामला पुराने झोडपलेले असताना इथलं सरकार महाराष्ट्रातील आमदारांना आश्रय देण्यात त्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्थ आहे. सरकारने आधी इथल्या नागरिकांकडे लक्ष द्यावे. ही बाब आसामसाठी हिताची नाही. अशा आशयाचं हे पत्र आहे. भूपेन कुमार यांनी हे पत्र हॉटेल ब्लू रेडिसनवर एका अधिकाऱ्याकडे दिलं आहे. गुवाहाटीवरून निघालेले एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर काय ठोस निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राचे राजकारण आता कोणते वळण घेते हे पहावं लागेल.

Latest Posts

Don't Miss