सर्व आमदार गोव्याहून मुंबई ला रवाना

तब्बल ११ दिवसांनी हे सर्व आमदार मुंबईत परतणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या सोबतच प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

सर्व आमदार गोव्याहून मुंबई ला रवाना

विधान परिषदेच्या निकालानंतर आधी सुरत व्हाया गुवाहाटी नंतर गोव्यात पोहचलेले एकनाथ शिंदे यांचे सर्व बंडखोर आमदार अखेर आज मुंबईकडे रवाना झाले आहेत. तब्बल ११ दिवसांनी हे सर्व आमदार मुंबईत परतणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या सोबतच प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पुन्हा गोव्याला रवाना झाले होते. आज ते सर्व आमदारांसोबत मुंबईत येणार आहेत.

गोव्यातील ताज हॉटेल सोडल्यानंतर या सर्व आमदारांना ट्रॅव्हल बसने गोवा एरपोर्टवर सोडण्यात आले. तिथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार विमानाने मुंबईला येतील अशी माहिती मिळतेय. मुंबईत परतण्यासाठी या सर्व आमदारांना विशेष विमानाची सोया देखील करण्यात आली आहे.

Exit mobile version