मुंबई, ठाण्यासह १० जुलै पर्यंत जमाव बंदीचे आदेश

मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उप आयुक्त यांची बैठक पार पडली. या संदर्भात मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई, ठाण्यासह १० जुलै पर्यंत जमाव बंदीचे आदेश

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात ठीक ठिकाणी बंड केलेल्या आमदारांविरुद्ध असलेला असंतोष दाखवण्यात येत आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या आमदारांच्या कार्यालयाची तोड फोड करण्यात येत आहे. तर कुठे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात लावलेले फलक फाडण्यात येत आहेत. एकेठिकाणी कार्यकर्त्यांनी विरोध म्हणून शिंदे यांच्या फलकाला काळं फासून जोरजोरात घोषणा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे व गटातील आमदार राज्यात परत येण्याआधीच ही परिस्थिती असेल तर ते पोहोचल्यावर काही अघटित घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचे समजते.

मुंबईतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उप आयुक्त यांची बैठक पार पडली. या संदर्भात मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरात कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तसे मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे. कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेऊ नये, तोडफोड करू नये आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील राजकीय स्थिती पाहता सर्व पक्षांची कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांना बंदोस्ताच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिथे जिथे राजकीय कार्यक्रम बैठका सुरु आहेत त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह बॅनर लागणार नाही याची दक्षाता घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मुंबईसह ठाण्यात देखील वरील सूचनांचे पालन करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. विशेष शाखेने सोशल मिडीयावर नजर ठेवून संबधितांना आवश्यक माहिती देण्यास सांगितले आहे. स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालीबाबत माहिती घेवून योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे.

Exit mobile version