spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेतील बंडखोरीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांना वेगळीच शंका..

कामागून एक घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांमध्ये या सर्व गोष्टींबाबत शंका निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडाळी चे इतके मोठे पाऊल उचललेले पाहता शिवसेनेच्या आधीच हे लक्षात कसे आले नाही ? असा प्रश्न आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांना पडला आहे. अचानक एकामागे इतके आमदार गुवाहाटीला पोहचल्यावर हा या दोन्ही पक्षांना दिलेला धोका तर नाही ना ? अशा चर्चा सध्या दोन्हीं पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागल्या आहेत.
मागच्या दोन दिवसात राज्यात अनेक घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी भावनिक संवाद साधला. “त्यात त्यांनी बंडखोर आमदरांपैकी एकाने समोर येऊन मला सांगावे की मी त्यांना मुख्यमंत्री म्हणून नकोय, मी लगेच या पदाचा राजीनामा देईन.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सह कुटुंब वर्षा वरुन मातोश्रीवर पुन्हा रवाना झाले. त्यावेळी अनेक शिवसैनिकांनी त्यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत हे मातोश्री बाहेर शक्ती प्रदर्शन करून दाखवून दिले.
त्यातच आता एकामागून एक घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांमध्ये या सर्व गोष्टींबाबत शंका निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंबद्दल इतका असंतोष का ? शिवसेना आमदार गुवाहाटीला पाठवण्यात सेनेतील कोणी मुद्दाम खेळी तर करत नाहीये ना? असा प्रश्न नेत्यांना पडला आहे.

Latest Posts

Don't Miss