spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांना पुन्हा ईडीचा समन्स; “मला अटक करा” संजय राऊत यांची पोस्ट चर्चेत

संजय राऊत यांच्यावरील ईडीची थेट कारवाई हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध  प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामध्ये दादरमधील एक फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर अडचण आणली आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे.
संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने या जमिनी खरेदी केल्या होत्या. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे. संजय राऊत यांच्यावरील ईडीची थेट कारवाई हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा फेरा थेट संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला आहे. संजय राऊत यांना ईडीची नोटीस पोहचल्यावर त्यांनी ट्विटर वर पहिलीच पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, “मला नुकतेच कळले की ईडीने मला समन्स बजावले आहे. चांगले! महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठी लढाई लढत आहोत. मला रोखण्याचे हे षडयंत्र आहे. तुम्ही माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. मला अटक करा! जय हिंद!” असं त्यांनी ट्विटर ट्विट केलं आहे.
“2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जमीन आणि घर यासंदर्भातील कोणतीही चौकशी न करता जप्त करण्यात आली आहे.1 रुपया खात्यात आला असेल आणि तसं झालं असेल तर आम्ही सगळी संपत्ती भाजपला दान करायला तयार आहोत. पत्नीच्या आणि नात्यातील व्यक्तींच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या जमीनी जप्त करण्यात आल्या आहेत. दादर मधील घर जप्त करण्यात आलं आहे. भाजपचे नेते नाच करत आहेत. यातून लढण्याची प्रेरणा मिळते,” असं संजय राऊत यांनी एका मुलाखतीत सांगितले.

Latest Posts

Don't Miss