निवडणूक आगोच्या निकालावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रिया

काल दि. १७ फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि काढता पाय घेतला.

निवडणूक आगोच्या निकालावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रिया

काल दि. १७ फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि काढता पाय घेतला. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. तेव्हापासून या दोन्ही गटांमध्ये वाद हे सुरू होते. परंतु आज अखेर निवडणूक आयोगाने हा निकाल लावला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी त्यांची पहिली प्रतिकिया देत म्हणाले आहेत की, निकाल लागल्यानंतर चर्चा करता येत नाही. निकाल स्वीकारायचा, नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही परीणाम होत नसतो. लोक नवीन चिन्ह स्वीकार करतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद झाला त्यावेळी त्यांचं गाय आणि वासरू हे चिन्ह होतं. इंदिरा गांधी यांच्या हातून ते चिन्ह गेलं. त्यानंतर त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह घेतलं आणि निवडणुकीला सामोरं गेल्या. लोकांनी त्यांना आणि नव्या चिन्हाला स्वीकारलं. आता देखील नवीन चिन्ह लोक मान्य करतील. चिन्ह गेलं याचा फारसा परिणाम होत नसतो, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

तसेच या संदर्भात अजित पवार यांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह जरी शिंदे गटाला दिले असेल तरी सुद्धा उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात कदाचित जाऊ शकतात जर ते जनतेच्या कोर्टामध्ये गेले तर त्याच्या पाठीशी जनता असेल असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. खरी शिवसेना हि कोणाची हे निवडणुकीत सगळ्या समोर येईल असे वक्तव्य त्यांनी दिले. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी या संघटनेची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर पक्ष वाढवला सभा घेऊन सगळीकडे शिवसेना पक्षाची ओळख करून दिली आहे.

 

हे ही वाचा:

Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

Sharad Pawar Live : शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचा सत्कार

Makar Sankranti 2023 , संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version