सुषमा अंधारे व भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधारेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, …हा तर शुभशकुन

सुषमा अंधारे व भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधारेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, …हा तर शुभशकुन

ठाकरे गटाचा रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये जाहीर मेळावा पार पडला. संपूर्ण गडकरी रंगायतन कार्यकर्त्यांनी हाऊसफुल्ल झाले होते. या मेळाव्यामध्ये सर्व नेत्यांनी भाषणे केली. धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनीही मेळाव्याला उपस्थित राहत भाषण केले होते. या भाषणादरम्यान नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप गवस यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Shivsena : “भाजपला वीर सावरकर किती कळलेत?”, सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदेगटावर निशाणा

गवस यांनी तक्रारीमध्ये नेमकी कोणी काय वादग्रस्त वक्तव्य केली, हे देखील नमुद केले आहे. नेत्यांची भाषणे मुख्यमंत्री यांचा अवमान करणारी असल्याचे गवस यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. गवस यांच्या तक्रारीनंतर मंगळवारी कलम १५३, ५००, ५०४ प्रमाणे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन असल्याचं अंधारे यांनी म्हटलंय.

नेमकं काय म्हणाल्यात सुषमा अंधारे

महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून मी स्वतः, खासादर राजन विचारे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि आमच्या अनिताताई बिर्जे अशा पाच जणांवर १५३ नुसार गुन्हा दाखल झाल्याचे समजते. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन आहे. असं ट्वीट सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच ठाकरेंना धक्का, ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात?

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंडखोर सेना नेत्यांवर तुफान हल्लाबोल केला. भास्कर जाधव, सुषमा अंधारे, विनायक राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला. यावेळी भास्कर जाधवांनी शिंदेंची नक्कल केली, राऊतांनी राणेंची नक्लल केली, तर अंधारेंनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली.

राशी भविष्य १२ ऑक्टोंबर २०२२, तुमच्या जवळ आज पैसा आणि मनःशांती एकत्र नांदतील

Exit mobile version