धनुष्यबाण कुणाचा? आज होणार पुन्हा सुनावणी

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे.काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत .

धनुष्यबाण कुणाचा? आज होणार पुन्हा सुनावणी

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे.काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत . एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं. नंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळणार की शिंदे गटाला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर आज दि २० जानेवारी रोजी मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे . याचे महत्वाचं कारण म्हणजे येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

दरम्यान, मंगळवारी दि. १७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा केला होता. शिंदे गटाने दाखवलेलं चित्र काल्पनिक आहे, तसेच शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घेण्याची मागणी सिब्बल यांनी केली होती. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद बेकायदा असल्याचा युक्तिवाद केला. शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्यामुळे शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचं जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितलं होतं. आतापर्यंत शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे १६० राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, २,८२,९७५ संघटनात्मक प्रतिनिधी, १९,२१,८१५ प्राथमिक सदस्य अशा एकूण २२ लाख २४ हजार ९५० पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने १२ खासदार, ४० आमदार, ७११ संघटनात्मक प्रतिनिधी, २०४६ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि ४,४८,३१८ प्राथमिक सदस्य अशा ४,५१,१२७ पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. पण पक्षाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत सुरु असलेला कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय देईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षालाच दोष दिला! नाना पटोलेंचा हल्लाबोल

PM Narendr Modi Mumbai Visit Live, मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वतःचे खिशे भरले, देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version