spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivsena : “भाजपला वीर सावरकर किती कळलेत?”, सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदेगटावर निशाणा

एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असून, त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारण अनेक विविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहे.

नाश्त्यासाठी बनवा कोबीची वडी, जाणून घ्या रेसिपी…

राहुल गांधींनी काही वक्तव्य केले की, ‘भाजपवाल्यांना सावरकरांचे स्मरण होते. तथाकथित माफी प्रकरणाचा रिकामा खुळखुळा वाजवत बसण्यापेक्षा सावरकरांचे हिंदुत्व, हिंदू राष्ट्राचा विचार, हिंदुत्वाबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन, सैनिकीकरणावरील भर यावर देशातील प्रत्येक विद्यापीठात ‘अध्यासन’ असायला हवे.सावरकरांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगून जे सत्तेवर आले त्यांनी तरी या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? फक्त राहुल गांधींना दोष देऊन काय फायदा? घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला”, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

हेही वाचा : 

Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच ठाकरेंना धक्का, ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात?

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान तीन दिवसांपूर्वी कर्नाटकातील तिरुवेकरे येथे पत्रकारांशी बोलतांना राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर आरोप केले. ‘स्वातंत्र्ययुद्धात सावरकर हे इंग्रजांसाठी काम करीत होते. त्याचा त्यांना इंग्रजांकडून मोबदलाही मिळत होता,’ असे ते म्हणाले. राहुल गांधी यांचे सावरकरांवरील असे आरोप धक्कादायक असले तरी नवीन नाहीत. तसेच त्यानिमित्ताने भाजपवाल्यांना येणारे सावरकरप्रेमाचे उमाळेही नवीन नाहीत, अशा शब्दात राहुल गांधींसह भाजपवर टीका करण्यात आली आहे.

भाजपला वीर सावरकर किती कळलेत?

काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे. काँग्रेस सावरकरांचा अपमान करीत असते व त्या अपमानाबद्दल भाजपवाले जाब वगैरे विचारत असतात. आताही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या राहुल गांधीकृत अपमानावर संताप व्यक्त केला. सावरकरांच्या अपमानाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. आम्हीही यासंदर्भातील आमची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे, पण फडणवीसांच्या संतप्त भावना खऱ्या आहेत काय? भारतीय जनता पक्षाला तरी स्वातंत्र्य लढ्यातील वीर सावरकर किती कळले, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

Diwali 2022 : दिवाळी स्पेशल, घरच्या घरी बनवा ओल्या नारळाच्या करंज्या

Latest Posts

Don't Miss