spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

काल दि. १७ फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे.

काल दि. १७ फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि काढता पाय घेतला. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. तेव्हापासून या दोन्ही गटांमध्ये वाद हे सुरू होते. परंतु आज अखेर निवडणूक आयोगाने हा निकाल लावला आहे. त्यांनतर ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. तर आज दि १८ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक ही बोलावली आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १ वाजता पक्षाची तातडीची बैठक ही बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, खासदार, आणि नेते हे उपस्थित राहणार आहेत. हि संपूर्ण बैठक तात्काळ बोलवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांनंतर उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार याची चर्चा या बैठकीत होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीसाठी मतदारसंघात असलेले आमदार आणि खासदार तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. काल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का हा बसला आहे. त्यामुळे आता पुढील भूमिका काय असेल हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे.

तसेच दि २१ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नियमीत सुनावणी होणार आहे. तसेच या संदर्भात काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. जो निर्णय लागला तो अत्यंत अनपेक्षित आहे. निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. देशात बेबंदशाही सुरू झाली आहे हे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर करावं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. काय बोलायचे हाच प्रश्न आहे, देशात बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे. देशात बेबंदशाही सुरु झाली हे पंतप्रधान मोदींनी जाहीर करावं.’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच पुढे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. नामर्द कितीही मातला तरी मर्द होऊ शकत नाही. चोराला चोरी पचणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तर पुढे संतप्त प्रतिक्रिया देत ते पुढे म्हणाले नामर्दांनो ही चोरी पचणार नाही.

Latest Posts

Don't Miss