Shivsena UBT गटाचे ‘मुंबई मिशन’ होणार सुरु; ‘या’ १८ आमदारांना निवडणूक मतदारसंघाची दिली जबाबदारी

Shivsena UBT गटाचे  ‘मुंबई मिशन’ होणार सुरु; ‘या’ १८ आमदारांना निवडणूक मतदारसंघाची दिली जबाबदारी

विधानसभा निवडणूक म्हंटल्यावर प्रचार, दौरे हे तर आलेच परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे नेत्यांवरील जबाबदारी अतिशय महत्वाची असते. विधानसभा निवडणूकीसाठी राज्यामध्ये वातावरण निर्मिती केली जात आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. अशातच सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकांची चर्चा राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहीलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे यंदा ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात लढत दिसणार आहे.

अशातच राज्याचं विधानसभा निवडणुकांचं मैदान कोण मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली असून सर्व मतदारसंघांचा अभ्यास करण्यासाठी शिव सर्वेक्षण अभियान राबवलं होतं. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी शिव सर्वेक्षण अभियान शिवसेना ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील ४२ लोकसभा मतदारसंघात राबवलं होतं. आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ म्हणजे, छत्तीस विधानसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.

महाराष्ट्रातील ४२ लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियानानंतर शिवसेना ठाकरे गटानं ‘मिशन मुंबई’ वर लक्ष केंद्रीत केलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांची जबाबदारी १८ नेते आणि १८ सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता मुंबईत शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.

मुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी कोण आहेत प्रमुख नेते ?

  1. विनायक राऊत – वरळी, माहिम
  2. सुनील शिंदे – विक्रोळी, घाटकोपर (पु)
  3. दत्ता दळवी – कुर्ला, चांदिवली
  4. अनिल देसाई – जोगेश्वरी (पु), अंधेरी (पु)
  5. अनिल परब – मागाठाणे, दहिसर
  6. सुनील प्रभू – मुलुंड, भांडूप (प)
  7. अरविंद सावंत – अंधेरी (प), वर्सोवा
  8. राजन विचारे – विलेपार्ले, कलिना
  9. सुनिल राऊत – वांद्रे (पु), वांद्रे (प)
  10. वरुण सरदेसाई – सायन कोळीवाडा, धारावी
  11. मिलींद नार्वेकर – दिंडोशी, गोरेगाव
  12. रमेश कोरगांवकर – बोरीवली, कांदिवली
  13. मनोज जामसुतकर – चारकोप, मालाड
  14. अजय चौधरी – चेंबुर, अणुशक्तीनगर
  15. विलास पोतनीस – शिवडी, मलबार हिल
  16. विनोद घोसाळकर – वडाळा, भायखळा
  17. सचिन अहिर – कुलाबा, मुंबादेवी
  18. अमोल कीर्तिकर – घाटकोपर (प), मानखुर्द-शिवाजीनगर

हे ही वाचा:

यशस्वी कारभाराचा दाखला देत kolhapur मध्ये बॅनरबाजी..; ‘त्रिदेव अजिंक्य’ म्हणून बॅनर झळकले

मित्रपक्षांमध्ये जुंपणार रस्सीखेच; Andheri East Assembly मतदारसंघात होणार दोन वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version