शिवसेना उबाठा – शिंदे गटाच्या ‘या’ तीन नेत्यांची गुप्त भेट, Vidhansabha Election आधी पुन्हा होणार ‘राजकीय भूकंप’?

शिवसेना उबाठा – शिंदे गटाच्या ‘या’ तीन नेत्यांची गुप्त भेट, Vidhansabha Election आधी पुन्हा होणार ‘राजकीय भूकंप’?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची चिन्हे असून शिवसेना उबाठा गट (Shivsena UBT) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena) यांच्या गोटातून नवी बातमी समोर येत आहे. हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil ashtikar) आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. त्यामुळे आधीच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2024) आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले असतानाच या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून नागेश पाटील आष्टीकर आणि संतोष बांगर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हि भेट झाली असून आता वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

यावर बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि नागेश पाटील आष्टीकर हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत. माझ्या बंगल्यावर आणि मंत्रालयात ते भेटायला आले यामध्ये कोणतेही राजकारण नाही. ते जिल्ह्याच्या कामासाठी आले होते, आमदार संतोष बांगर सुद्धा होते. राजकारणामध्ये एकनाथ शिंदे मला जे जे आदेश देतील त्याचे मी पालन करतो यामध्ये कुठेही राजकारणाचा संबंध नाही. आताची भेट राजकीय नव्हती. चहा नंतर गप्पा होत असतात पण फक्त गप्पा राजकीय असतात असे नाही.”

ते पुढे म्हणाले “पालकमंत्री म्हणून मला जो अधिकार आहे त्या संदर्भात कामासाठी ते आले होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी जी जबाबदारी देतात ती जबाबदारी पार मी पाडतो आहे. कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला पक्षात नाही घ्यायचं हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील फक्त एकनाथ शिंदे यांना अधिकार आहे. मी कोणावरही नाराज नाही, माझ्यावर सर्वांचा विश्वास आहे, माझी कधीही नाराजी होणार नाही. अनेक राजकीय घडामोडी आमच्या जिल्ह्यात आमच्या मराठवाड्यात घडतात पण आमचे नेते एकनाथ शिंदेचे बोलतात त्याचे पालन करणारा मी कार्यकर्ता आहे.”

हे ही वाचा:

Devendra Fadnavis यांनी केली मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

Sambhaji Bhide यांच्या महिलांवरील ‘त्या’ वादग्रस्त व्यक्तव्यावरुन पुण्यात रंगलं ‘बॅनरवॉर’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version