spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ajit Pawar यांच्यावर कसला दबाव? ते अपमान का सहन करतात? Tanaji Sawant यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा सवाल

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) जवळ आल्या असल्या तरी महायुतीमध्ये (Mahayuti) काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. अश्यातच कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं. परंतु त्याच्या या विधानाला विरोधकांनी मात्र चांगलंच फैलावर घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dube) यांनी यावरून प्रतिक्रिया देत, “अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर कसला दबाव आहे? ते अपमान का सहन करत आहेत?” असा सवाल उपस्थित केला आहे.

यावेळी आनंद दुबे माध्यमांशी संवाद साधत म्हणाले, “महायुतीमधील अंतरकलह लोकांच्या समोर आला आहे. ज्या प्रकारे तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री आहे ते म्हणाले अजित पवार आणि त्यांचे नेते यांना बैठकीत बघतो त्यावेळी उलटी आल्यासारखं होतं. त्यानंतरही अजित पवार आणि त्यांचे नेते काही बोलत नाही त्यांच्यावर कसला दबाव आहे? ती वेळ होती जेव्हा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लागायचे. त्यांचा इतका अपमान होत आहे कधी भाजपकडून कधी आरएसएस कधी शिंदे गटाकडून, अजित पवार यांच्यावर ईडी सीबीआय चा दबाव आहे का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, “अजित पवार शरद पवार यांच्यासोबत असते तर असं झालं नसतं, तुम्ही अडीच वर्ष महाविकास आघाडीमध्ये होता पण मित्रपक्ष कधीही तुम्हाला असं बोलले नाहीत. तुमची परिस्थिती दुर्दैवी झाली आहे. मग का सहन करत आहेत?,” असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

तानाजी सावंत यांचा नागरिकांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. यामध्ये ते म्हणतात, “आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये असलो तरी पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो कि उलट्या होतात. आपल्याला त्यांची ऍलर्जी आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss