Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटातून ‘या’ दिग्गज नेत्याची हकालपट्टी

बीडच्या राजकाणातून एक मोठी बातमी आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटातून ‘या’ दिग्गज नेत्याची हकालपट्टी

बीडच्या राजकाणातून एक मोठी बातमी आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात शिवसेनेचे ( shivsena) काम करत असताना जयदत्त क्षीरसागर हे कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो लावत नाहीत. क्षीरसागर यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची कधी भेट घेतली नाही. नुकताच एक उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यात उद्धव ठाकरे यांचा फोटो नव्हता आणि त्यांच्या नावाचाही उल्लेख केला नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचा आजपासून शिवसेनेची काही संबंध राहणार नाही, अशी घोषणा जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परंतु शेतकऱ्यांना ठोस मदत झाली नाही. आता शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्याआधीच बड्या नेत्याची हकालपट्टी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

जयदत्त क्षीरसागर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र त्यांना त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

शिवसेनेचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आमचा त्यांना विरोध होता. कारण आम्ही त्यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात काम केलं होतं. आमच्यावर अनेक खोट्या केसेस झाल्या होत्या. क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना त्रास दिला होता. पण शिवसेनेत त्यांचा प्रवेश झाल्यानंतर आम्ही शांत बसलो. आज त्यांना पक्षातून काढून टाकण्याची जबाबदारी आमच्यावर दिली ही मोठी गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.

येणाऱ्या निवडणुका आम्ही आमच्या ताकदीवर लढवणार आहोत, असे त्यांनी सांगितलं. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. अनेकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आहोत. असेही जगताप म्हणाले. यावेळी संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव, यांची उपस्थिती होती.

हे ही वाचा:

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, हा तर भाजपचा…

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर

Ola Electric Scooter Launched : Ola चा दिवाळी धमाका! कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version