spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivsena Uddhav Balasaheb thackeray : ‘कोणत्याही दबावाला ऋतुजा लटके बळी पडणार नाही’ ; अनिल परब

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांचं दुर्दैव निधन झाले. येत्या ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभे ची निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे. सध्या ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास आणखी १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. राजीनामा स्वीकारण्यास तांत्रिक अडचण असल्यानं लटके यांच्या उमेदवारीबाबत ठाकरे गटासमोर (Uddhav Thackeray) पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्ल्क असताना राजीनामा स्वीकारला गेला नसल्यानं लटकेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. ‘कोणत्याही दबावाला ऋतुजा लटके बळी पडणार नाही’ असा दावा अनिल परब यांनी याप्रसंगी केला आहे.

हेही वाचा : 

ADNL : गौतम अदानी एअरटेल-जिओला टक्कर देण्यासाठी तयार, ADNL 5G सेवेच्या स्पर्धेत उतरणार

एका प्रकारे डाव साचला असलयाचे सांगण्यात आलेत आहे. दबावापोटी उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही. असे अनिल परबांनी सांगितले आहे. त्याच बरोबर अनिल परब यानी स्पष्ट केलं की, रमेश लटके यांना न्याय देण्यासाठी ऋतूजा लटके यांना संधी देण्यात आली होती. लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे. ऋतूजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला की, त्या ठाकरे गटाकडून लढतील असंही अनिल परब यानी स्पष्ट केलं आहे.

सुषमा अंधारे व भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधारेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, …हा तर शुभशकुन

Latest Posts

Don't Miss