Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून तीन नवीन पर्याय मागवण्यात आले होते, त्यापैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव वापरण्यास परवानगी दिली असून निवडणूक चिन्ह म्हणून 'मशाल' वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून तीन नवीन पर्याय मागवण्यात आले होते, त्यापैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव वापरण्यास परवानगी दिली असून निवडणूक चिन्ह म्हणून ‘मशाल’ वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालेलं आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी ! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह ‘मशाल’

दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून नवीन चिन्हाचा फोटो जाहीर करण्यात आला आहे, शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लगेचच या नवीन चिन्हाचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी शिवेसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे कॅप्शन देत पक्षचिन्हाचा फोटो ट्विट केला आहे. उध्दव ठाकरे गटाचे चिन्ह वर धगधगती मशाल आणि खाली मोठ्या अक्षरात शिवसेना आणि त्याखाली उध्दव बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षचिन्हाचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरे गटाची नावावर आणि चिन्हावर प्रतिक्रिया; उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली

नवे चिन्ह आणि नव्या नावावर किशोरी पेडणेकर आणि सुष्मा अंधरेंची प्रतिक्रिया

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version