spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकसभेत स्मोक क्रॅकर घेऊन घुसखोरी केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा

लोकसभेत स्मोक क्रॅकर घेऊन घुसखोरी केल्याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सागर शर्मा याने याबाबत माहिती दिली.

लोकसभेत स्मोक क्रॅकर घेऊन घुसखोरी केल्याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सागर शर्मा याने याबाबत माहिती दिली.

स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरने संसद भवनाबाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्लॅन केला होता. परंतु नंतर त्याने योजना बदलली. आत्मदहन करण्यासाठी सागरने एक जेल प्रकारातलं रसायन ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार केला होता. अशा जेलममुळे आगीपासून शरीराचा बचाव करता येतो. परंतु ऑनलाईन पेमेंट झालं नसल्याने तो ते जेल खरेदी करु शकला नाही.

संसदेत घुसखोरी केलेल्या आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी स्थानिक कोर्टात सांगितलं की, संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला ललित झा हा संपूर्ण कटाचा सूत्रधार आहे. या सगळ्या आरोपींना देशामध्ये अराजकता पसरवायची होती.

सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यास भाग पाडण्यासाठी आरोपींनी सगळा कट रचला होता. या प्रकरणी पोलिस १३ डिसेंबर रोजी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे. त्यासाठी संसदेची परवानगी घेतली जावू शकते. ललित मोहन झा हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. शुक्रवारी त्याला कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पटियाला हाऊस कोर्टात ललितने संसदेतील घुसखोरीचा कट केल्याचं कबूल केलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. यासह आरोपी कुठल्या देशांशी किंवा संघटनेची संबंधित आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss