‘त्या’ फोटोवर श्रीकांत शिंदेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, हे सगळं हास्यास्पद…

मला वाटत हे सगळं हास्यास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते दिवसाचे १८ - १८, २० - २० तास काम करतायत.

‘त्या’ फोटोवर श्रीकांत शिंदेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, हे सगळं हास्यास्पद…

मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यांचा एक फोटोदेखील व्हायरल होत आहे. त्यावर आता एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला वाटत हे सगळं हास्यास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते दिवसाचे १८ – १८, २० – २० तास काम करतायत. त्यांच्या गैरहजेरीत त्यांची कामं करण्याची कोणालाच गरज नाही, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी व्हायरल झालेल्या फोटोवर दिली आहे.

फोटोत दिसणाऱ्या या कार्यालयातून आम्ही वर्षानुवर्षे अगदी एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होण्याआधीपासून लोकांची गाराणी ऐकत आलोय, त्यांचे प्रश्न सोडवत आलोय. त्यामुळे या ऑफिस फार आधीपासून कामासाठी केला. मुख्यमंत्रीही या ऑफिसचा वापर करतात. फोटोतील बोर्डबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, फोटोत दिसत असलेला बोर्ड हा मुव्हेबल बोर्ड आहे आणि तो एखाद्या कर्मचाऱ्याने तिथे ठेवलंय याची कल्पनाही मला नव्हती. एखादी गोष्ट फुगवायची आणि तिचा बागुलबुवा करायचा सांगायचं शासकीय कामात अडथळा निर्माण करायचं काम आम्हाला बदनाम करण्यासाठी केलं जात आहे.

तसेच त्यांनी तुमचा आधीचा अनुभव वेगळा असेल पण आताचा अनुभव वेगळा आहे, म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. शिंदेसाहेबांचं काम पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकु लागल्यामुळे ते हे सर्व प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकं सुज्ञ आहेत, त्यांना आधीचाही अनुभव आहे आणि आताचाही त्यामुळे आपण लोकांना फसवू शकत नाही, असेही श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.

काय म्हणाले मुनगट्टीवर?

मागच्या अडीच वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं नसल्याने हे आरोप केले जातायत. तसेच गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री कोण होतं, हे ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी असं ट्विट करणं आश्चर्यकारकच आहे. अशा खोचक शब्दात मुनगट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते म्हणाले, जर एखाद्या खुर्चीवर कुणी बसलं तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही.

मागे झालेल्या स्टेट वाइल्डलाइफ बोर्डाच्या मीटिंगमध्ये मला मुख्यमंत्री म्हणाले ही आता वाइज प्रेसिडेंट म्हणून तुम्ही चालवायची आहे तर, त्याविरुद्ध राज्याच्या प्रगतीला धोका निर्माण झालाय असं ट्विट अडीज वर्षे मुख्यमंत्री कोण आहेत, हे माहीत नसणाऱ्यांनी करणे आश्चर्यकारक आहे.

नेमंक प्रकरण आहे तरी काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केला आहे. रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो समोर आणला आहे. त्या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा आरोप रविकांत वरपे यांनी केला आहे. यावरून आता वातावरण तापलं आहे.

हे ही वाचा:

श्रीकांत शिंदेंचा फोटो होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार

Dasara Melava : हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, दुपारनंतर पुन्हा सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version