SHRIKANT SHINDE: व्हीआयपी कल्चर नकोय, रस्ता बंद करण्याचा आम्हाला अधिकार नाही

SHRIKANT SHINDE: व्हीआयपी कल्चर नकोय, रस्ता बंद करण्याचा आम्हाला अधिकार नाही

मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस चिघळात चालला असून त्यानुसार आंदोलनामुळे काही विपरीत घडू नये यासाठी मंत्र्यांच्या घराचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) राहत असलेल्या लुईस वाडी या भागात बंदोबस्त वाढवला असून रस्ता बंद करण्याच्या अधिसूचना देण्यात आल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा येण्या जाण्याचा रस्ता त्या भागातून असल्यामुळे रस्ता बंद करण्यात यावा अशी अधिसूचना काढण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (DR. SHRIKANT SHINDE) यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्वसामान्यांचा रस्ता बंद करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. आम्हाला कोणतीहा व्हीआयपी कल्चर नकोय, त्यामुळे हा रस्ता खुला करण्यात यावा, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (DR. SHRIKANT SHINDE) यांनी मांडले. त्यानुसार ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना विनंती केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने मुख्यमंत्र्यांचे ‘शुभदीप’ (SHUBHDEEP) हे निवासस्थान असलेल्या लुईस वाडी परिसरातील वाहतूक बदलांसाठीचे एक परिपत्रक बुधवारी जारी केले त्या पत्रकात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसाठी म्हणजे आमच्यासाठी वाहतूक बदल प्रस्तावित केल्याचा उल्लेख आहे. त्यात माझ्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अशा पद्धतीने आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतुकीत बदल करण्याबाबतची कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा माझ्या कुटुंबाने केली नव्हती. तसेच, अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वक कल्पनाही देण्यात आली नव्हती, अशी माहिती डॉ. श्रीकांत शिंदे (DR. SHRIKANT SHINDE) यांनी दिली.

वाहतूक विभागाकडून परस्पर काढण्यात आलेल्या या पत्रामुळे प्रसिद्धी माध्यम आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संताप जनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आमचे येणे-जाणे सुकर व्हावे, यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडवण्याचा अधिकार आम्हाला नाही. ते व्हआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाण्यातील नागरिकांना त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्नही फोल ठरणारा आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे तो नक्कीच योग्य नसल्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version