श्रीकांत शिंदेंचा फोटो होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

श्रीकांत शिंदेंचा फोटो होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार

शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यापासून रोज नवनवीन टीका ते एकमेकांवर करत असतात. तसेच अनेकदा यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील उडी घेत असतात. सध्या सुद्धा असाच एक नवा वाद सुरू झालाय आणि हा वाद राष्ट्रवादी काँग्रेसमधील रविकांत वरपे यांनी शेअर केलेल्या एका फोटमुळे सुरू झाला आहे आणि त्यांनी शेअर केलेला हा फोटो इतर कुणाचा नसून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केला आहे. रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो समोर आणला आहे. त्या फोटोमध्येShrikant Shinde’s photo is going viral, In absence of CM taking the responsibility on position श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा आरोप रविकांत वरपे यांनी केला आहे. यावरून आता वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही श्रीकांत शिंदे यांचे फोटो शेअर करत गंभीर आरोप केला आहे. मेहबूब शेख यांनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. मुख्यमंत्री पदाची गरीमा धुळीस मिळवण्याचे काम हे शिंदे पिता पुत्र करत असल्याचे दिसत आहे. हा कोणता राजधर्म आहे ? बाप नंबरी ,बेटा दस नंबरी ..! याचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे ..!’

हे ही वाचा:

Dasara Melava : हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, दुपारनंतर पुन्हा सुनावणी

… ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत; राज ठाकरेंनी सोशलमिडियाद्वारे केला संताप व्यक्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version