ठाकरे गटाच्या पाठिंब्यानंतर शुभांगी पाटील नॉट रिचेबल

ठाकरे गटाच्या पाठिंब्यानंतर शुभांगी पाटील नॉट रिचेबल

नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या सकाळपासून नॉटरिचेबल झाल्याचे समोर आले आहे. शुभांगी पाटील या नॉट रिचेबल असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास बाकी आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. त्यातच शुभांगी पाटील या नॉट रिचेबल (Not reachable) झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शुभांगी पाटील या अर्ज मागे घेणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेनं पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. बैठकीत अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील सहीत अनेक नेते उपस्थित होते. नाशिक विधान परिषद मतदार संघ निवडणुकीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्ष लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

शुभांगी पाटील या ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत अज्ञातस्थळी रवाना झाल्याचंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे त्या कुणासोबत आहेत याची काहीच मिळत नाहीये. त्यामुळे शुभांगी पाटील यांच्या मनात नेमकं काय आहे हे सांगणं कठिण झालं आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास बाकी आहेत. या दोन तासात त्या मीडियासमोर येणार का? असा सवालही केला जात आहे. शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजपनेही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच महाजन नाशिकमध्ये आले होते. सत्यजित तांबे यांची बिनविरोध निवड करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच शुभांगी पाटील या कुठे आहेत याची माहितीही ठाकरे गटाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल ईडी कार्यालयात दाखल

उर्फीच्या वादात शर्मिला ठाकरेंची उडी

नारायण राणेंच्या हस्ते G-20 परिषदेची सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version