Shubhangi Patil यांची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया, झाशीची राणी लढली तसं मला लढायचं

गेल्या कितीतरी दिवसांपासून राज्यात पदवीधर निवडणुकांमुळे वातावरण चांगलच तापलंय. त्यातच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दाखल केलेल्या अर्जामुळे हे वातावरण अजूनच तापले होते.

Shubhangi Patil यांची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया, झाशीची राणी लढली तसं मला लढायचं

गेल्या कितीतरी दिवसांपासून राज्यात पदवीधर निवडणुकांमुळे वातावरण चांगलच तापलंय. त्यातच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दाखल केलेल्या अर्जामुळे हे वातावरण अजूनच तापले होते. काल दि २ फेब्रुवारी रोजी अखेर महाराष्ट्रातल्या या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नाशिक निवणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष हे लागले होते. नाशिक जिल्ह्यात सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होती. यामध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली. तर शुभांगी पाटील यांना फक्त ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं. शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झालाय. या पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

नाशिकमधील पराभवानंतर उमेदवार शुभांगी पाटील यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. यावेळेस त्या म्हणाल्या, “४० हजार मते पडणं एक सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून ४० हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. यात जुन्या पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी १५ वर्ष म्हणजेच तीन टर्म काय हे सगळ्यांना माहित आहे, आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार.”

तसेच कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली असून नागपूर मतदार संघात त्यांना मविआ समर्थित उमेदवाराकडून पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातदेखील आता मविआने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंनी भाजपच्या किरण पाटलांचा औरंगाबादात पराजय केला आहे. तर, अमरावती पदवीधर, नाशिक पदवीधर मतदारसंघाची आता मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी भाजप जरा पिछाडीवर आहे तर, नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत.

हे ही वाचा:

Amul Milk Price Hike, सर्वसामान्यांना मोठा धक्का, अमूल दुधाच्या दरात करण्यात आली ‘इतकी’ वाढ

राशी भविष्य , ३ फेब्रुवारी २०२३, वृषभ राशींच्या व्यक्तींचं आर्थिक नुकसान…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version