spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तर आज Uddhav Thackray, Aditya Thackeray जेलमध्ये असते; Shyam Manav यांचा खळबळजनक दावा

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी एक मोठा गौप्य्स्फोट केला असून राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. श्याम मानव यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. आज (बुधवार, २४ जुलै) पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी देशातील ईडीसारख्या (ED) यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो ते सांगितले.

श्याम मानव यांनी पत्रकारांशी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्या अटकेचे उदाहरण देत सांगितले कि, “अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडे काहीच नव्हतं. सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आलेला १०० कोटींचा आरोप नंतर सव्वा कोटींवर आला. प्रत्यक्षात त्याचाही काही पुरावा मिळाला नाही. न्यायालयानेही नंतर हेच सांगितलं. मात्र, तरीही त्यांना अटक झाली. कारण, त्यांनी सत्ताधाऱ्यानी लिहून दिलेल्या चार प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास नकार दिला होता,” असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांना सहीसाठी दिलेली प्रतिज्ञापते कोणती याची माहिती दिली. ते म्हणाले, “पहिल्या प्रतिज्ञापत्रात लिहिल्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांनी दिशा सालियन (Disha Saliyan) या मुळावर बलात्कार केला आणि तिचा खुन केला. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांनी अनेक घोटाळे केले आहेत. तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवगिरी बंगल्यावर बोलवून त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या उपस्थितीत गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते, ” असे गंभीर आरोप केले होते.

“या चार प्रतिज्ञापत्रांवर सही केल्यास तुम्हाला ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळेल असं देशमुख यांना सांगण्यात आलं. देशमुख यांनी खूप विचार केल्यानंतर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एक ऑफर देण्यात आली. अजित पवारांबद्दल बोलणं शक्य नसेल तर इतर तीन प्रतिज्ञापत्रांवर सही करून द्या. त्यांनी सही केली असती तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब आज जेलमध्ये असते,” असे मानव यावेळी म्हणाले.

श्याम मानव यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता यावर सत्ताडहऱ्यांकडून काय उप्रत्युत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

जेव्हा खर्गे यांनी निर्मला सीतारामन यांना आई म्हणून हाक मारली तेव्हा धनखड यांनी टोकले, ‘तुमच्या मुलीच्या बरोबरीची आहे…’

Mahayuti मध्ये आता पडणार फूट ? ; ‘मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजना’ झाली ‘माझी लाडकी बहीण योजना’ !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss