सिसोदिया यांच्या अडचणी वाढ; सीबीआयने केली लुकआउट नोटीस जारी

सीबीआयने सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केल्यामुळे

सिसोदिया यांच्या अडचणी वाढ; सीबीआयने केली लुकआउट नोटीस जारी

मनीष सिसोदिया

दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली आहे. या नोटिसमध्ये सीबीआयने ज्या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे त्यांची नावे आहेत. मात्र, यामध्ये मुंबईच्या एन्टरटेन्मेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर यांच्या नावाचा समावेश नाही.

दिल्लीतील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन येत्या 2 – 3 दिवसात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे असे सांगितले. दरम्यान, सीबीआयने सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण, आता ते हा देश सोडून जाऊ शकणार नाहीत आणि त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांना ताब्यातही घेतले जाऊ शकते.

सीबीआयने परिपत्रक जारी केल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पीएम मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, “समजा, हळू हळू ऋतूही बदलत राहतात, तुमच्या वेगासोबत वारेही चकित होतात सर”

सीबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात मुंबई स्थित एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर यांच्या नावाचा समावेश नाही. विजय नायर हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त अजूनही देशाबाहेर आहेत. “मी देशातून पळून आलो नसून माझ्या वैयक्तिक कामासाठी बाहेर आलो आहे”, असे विधान नायर यांनी शनिवारी केले.

नायर म्हणाले की “माझ्या मुंबईतील घरावर शुक्रवारी छापा टाकण्यात आला. मी माझ्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांशी फोनवर बोलल. मी त्यांना विचारले की मला यायचे आहे का त्यांनी मला सांगितले की आलोक नावाचे सीबीआय अधिकारी माझ्याशी संपर्क साधतील आणि मला कळवतील की कधी आणि कुठे तक्रार करायची आहे. मला ना कुठली नोटीस मिळाली ना मला आलोक यांचा फोन आला. मी फरार आहे असे म्हणणे चुकीचा आहे. सीबीआयच्या नोटीस वर मी पूर्णपणे सहकार्य करेन”.

दिल्लीतील दारू घोटाळ्या बाबत भाजप नेते कपिल मिश्रा यांनी सातत्याने आम आदमी पार्टी यांच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील घोटाळ्याबाबत आजपासून ते दिल्लीत शंभर बैठका घेणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. कपिल यांनी लिहिले आहे की, “आजपासून मी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या घोटाळ्यावर दिल्लीत जाहीर सभा आणि पथकसंचलन सुरू करत आहे. संपूर्ण दिल्लीत शंभर सभा करणार आहे. दिल्लीतील जनतेची चोरी करणाऱ्या केजरीवाल टोळीला माफ केले जाणार नाही”.

सीबीआयने नाव दिलेल्या आरोपींची यादी

हे ही वाचा:

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2022: तारीख, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

Exit mobile version