त्यामुळे भाजपपासून लांब राहा, आरपीआयच्या नेत्याचा तांबेंना सल्ला

"सत्यजित तांबे आपण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे नेतृत्व करतो. त्यामुळे भाजपापासून दोन हात लांब रहा," असे सचिन खरात यांनी म्हंटले आहे.

त्यामुळे भाजपपासून लांब राहा, आरपीआयच्या नेत्याचा तांबेंना सल्ला

राज्यात सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणी आणि छाननी प्रक्रिया चालू आहे. याच पार्श्वभूमीवर काल नाशिकमध्ये अर्ज भरतीच्यावेळी एक राजकीय ट्विस्ट बघायला मिळाला. काँग्रेसकडून उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही तर त्यांचा मुलगा आणि कॉंग्रेसचे युवा प्रदेशअध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून एबी फॉर्म आलेला असतांनाही अर्ज दाखल न केल्याने आणि भाजपने अद्याप कुणालाही एबी फॉर्म न दिल्याने तसेच सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्याने सत्यजित तांबे यांच्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबे यांना असं किती दिवस बाहेर ठेवणार?, असा सवाल केला होता. तसेच चांगल्या माणसांवर आमचा डोळा असल्याचं म्हटलं होत. त्यामुळे सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्या भूमिकेशी भाजपाची कोणती राजकीय खेळी तर नाहीना ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची देखील चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असून भाच्याने सर्वांना मामा बनविल्याची टीका देखील बाळासाहेब थोरातांवर होत आहे. या राजकीय गोंधळावरून आरपीआयचे सचिन खरात यांनी सत्यजित तांबे यांना भाजपपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.

यावेळी खरात म्हणले,”सत्यजित तांबे आपण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे नेतृत्व करतो. त्यामुळे भाजपापासून दोन हात लांब रहा,” असे सचिन खरात यांनी म्हंटले आहे.

सत्यजित तांबे हे महाराष्ट्र राज्यामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत. मात्र त्यांनी यांनी गुरुवारी अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून सचिन खरात यांनी सत्यजित तांबेंना आपण वेगळ्या विचारधारेचे नेतृत्व करतो असं सांगत भाजपपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले,”महाराष्ट्र राज्यातील रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले आहे. परंतु भारतामध्ये आता फुले, शाहू, आंबेडकर विचार विरुद्ध गोळवळकर, हेडगेवार यांच्या विचारांची लढाई चालू आहे आणि सत्यजीत तांबे तुम्ही तर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे नेतृत्व आहात. त्यामुळे भाजपपासून दोन हात लांब राहावे, असं मी तुम्हाला आवाहन करत आहे,” असं राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे सचिन खरात यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

२ वर्षांनी रंगणार सिद्धेश्वर महाराजांची ‘गड्डा’ यात्रा, नेत्यांनीही लावली हजेरी

अन्याय होत असेल तर शिवसेनेत स्वागत आहे, पंकजा मुंडे यांना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version