‘… म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का ?’ , अरविंद सावंत यांची टीका

ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाला निवडणूक आयोगामुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

‘… म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का ?’ , अरविंद सावंत यांची टीका

ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाला निवडणूक आयोगामुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे शिवसेनेचे अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठविलं. यासंदर्भात अरविंद सावंत म्हणाले, शिंदे गटाचं अस्थित्व काही नाही. निवडणूक आयोगानं (Election Commission) चिन्ह गोठविलं. हा मुद्दा गैर आहे. जे अर्ज करतात ते अंधेरीतील निवडणूक लढविणार आहेत का? भाजप निवडणूक लढविणार नाही. पण, हा भाजपचा अजेंडा आहे.

अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली. चिन्ह गोठविलं पण, रक्त पेटविलं आमचं. या सगळ्यानं आम्ही घाबरणार नाही. या पद्धतीनं भाजपचे नेते वागणूक देतील, असं वाटत होतं. देशाचे गृहमंत्री म्हणतात खरी शिवसेना शिंदे गटाची आहे. म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली. ते म्हणाले, भाजपचे प्रवक्ते म्हणतात. पाच वर्षे काही होणार नाही. सर्व जनतेला कळतंय, हे महत्त्वाचं आहे. शिंदे गटातील लोकं हे शिवसेनेच्या पाठीत सुरा खुपसून गेलेत. हे कठपुतळी बाहुले भाजपच्या इशाऱ्यावर नाचताहेत, असा घणाघात अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर केला.

सर्वोच्च न्यायालय न्याय देणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश म्हणतात. तेव्हा देशाच्या लोकशाहीवर, घटनेवर घाव घातला जात आहे, हे स्पष्ट आहे, असा घणाघातही सावंत यांनी केला. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे गुलाम झाले आहेत. हे जगाला कळलं आहे. निवडणूक आयोग ही न्यायिक संस्था आहे. कुणाच्यातरी सांगण्यावरून निर्णय देतात, हे योग्य नसल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

पुढे अरविंद सावंत म्हणाले आहेत कि, निवडणूक आयोग कसं वागतोय. चार तासांत निर्णय देणं. दिलेल्या माहितीची छाननी न घेणं. नोटरीची माहिती न घेणं, यावरून निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर निर्णय देतो, हे समजतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आलेत. विश्वासघातकी पक्ष म्हणजे भाजप आहे. ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय मी सांगणार. जी पाऊलं पडत होती. ती योग्य नाही. यांनी लोकशाही मानायचीच नाही, असं ठरविलंय. बाबासाहेबांच्या संविधानाकडं दुर्लक्ष केलंय.

हे ही वाचा:

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे ; नाना पटोले

आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version