सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; दवाखान्यात दाखल करण्यात आले

सोनिया गांधी अजूनही कोरोना बाधित असून त्यांचे आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट मध्ये कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली नाही असं रणदीप सुरजेवला यांनी ट्विटर कळवले आहे.

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; दवाखान्यात दाखल करण्यात आले

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रविवारी सकाळी दिल्ली येथील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटर वरून दिली आहे. २ जून दरम्यान सोनिया गांधी यांना कोरोना ची लागण झाली होती. त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले होते. पण त्रास वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (sonia gandhi hospitalized) सोनिया गांधी अजूनही कोरोना बाधित असून त्यांचे आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट मध्ये कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली नाही असं रणदीप सुरजेवला यांनी ट्विटर कळवले आहे.

हळू हळू सोनिया गांधी यांची तब्येत स्थिर होत असून त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करून सांगितले की, ‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्ली येथील गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोनासंबधित त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस सोनिया गांधींना डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात येणार आहे.

सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली होती. आता सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळ त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version