सोनिया गांधी यांची 21 जुलै रोजी होणार ईडी चौकशी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात 21 जुलै रोजी हजर राहण्यास ईडीने आदेश दिले आहे.

सोनिया गांधी यांची 21 जुलै रोजी होणार ईडी चौकशी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात 21 जुलै रोजी हजर राहण्यास ईडीने आदेश दिले आहे. तत्पूर्वी या प्रकरणी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग चार दिवस चौकशी केली होतो.

यापूर्वी सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी मागितला होता. ज्याची मुद्दत 22 जुलै रोजी संपत आहे.

नेमकं का प्रकरण आहे ?

भारताचे माजी पंतप्रधान व काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र सुरू केले होते. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे

हेही वाचा : 

कॉफी विथ करण शो मध्ये कार्तिकने सारा बद्दल जे सांगितले त्यामुळे सारा नाराज

Exit mobile version