spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात

सध्या सर्व पक्ष मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने मराठी लोकांचे मन जिकंण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मैदानात उतरणांर आहे. अजून महापालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नवीन वर्षात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत मोठी सभा होणार आहे.

वर्षाच्या सुरवातीलाच राज ठाकरे यांची पहिली सभा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. मुंबई महापालिकेतील प्रमुख पक्षांना टक्कर देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी पक्षबांधणी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक समस्या आणि विषयांवर राजकीय पक्ष ठामपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील ‘घे भरारी’ अभियान राबवत आता मुंबईकरांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी सुरुवात केलेली आहे. घे भरारी अभियानांतर्गत प्रत्येक वॉर्डमध्ये सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षाची भूमिका मुंबईत दादरमध्ये (Dadar) आता सभा घेऊन स्पष्ट करणार आहेत.

राज ठाकरे यांची पहिली सभा आगामी महापालिका दृष्टीने पार पडणार असल्याने ते या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. राज ठाकरे हे या सभेमध्ये मुंबई महापालिका दृष्टीने आपली ब्लू प्रिंट आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारण यावर भाष्य करतील. आगामी महानगरपालिकाच्या दृष्टिकोनातून मनसेचे दादर-माहिम मतदारसंघातील सात वॉर्डवर राज ठाकरेंचं लक्ष आहे. राज ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा ही आगामी महापालिका दृष्टीने मुंबईतील मनसेची भूमिका ही स्पष्ट करणारी असणार आहे.

हे ही वाचा:

अश्या प्रकारे सुरु झाली Prasad – Manjiri Oak च्या प्रेमाची अनोखी कहाणी, पोस्ट होतेय व्हायरल

योगेश कदम यांच्या अपघातावर राम कदम त्यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss