spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुणे पोट निवडणुकीवर देशाच्या गृहमंत्र्यांचे खास लक्ष, ‘या’ तारखेला अमित शाहचा होणार पुणे दौरा

सध्या महाराष्ट्रात खूप मोठ्या घडामोडी दिसून येत आहेत. कारण काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट तयार झाले. त्या पाठोपाठ पदवीधर निवडणुकीवरून (Bypolls) काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीची चर्चा ही राज्यभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच राज्यभरातील सर्व पक्षांकडून निवडणूक लढवण्याची तयारी जोमात सुरु आहे. त्यात आता पुण्यातील या कसबा चिंचवड पोटनिवडणुकीवर राज्यातील नेत्यांसह देशातील गृहमंत्र्यांची विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कारण कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी गृहमंत्रीअमित शाह यांचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे.

अलीकडेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबई दौरा केला होता आणि आता उद्या दी. १० फेब्रुवारीला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आला होता असे मानले जात होते. तर आता सध्या पुण्यातील कसबा चिंचवड पोटनिवडणुकीने राज्यच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. कारण कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौरा करणार आहेत. १८ तारखेला अमित शाहा यांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर १९ तारखेला अमित शाह हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी भाजपकडून मोठा सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सध्याच्या काळात पुण्यात होणाऱ्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण ही निवडणूक जिंकणं हे भाजपसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच निवडणुकीच्या काळात देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दौरा करणार आहेत. यावेळी कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या सह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : 

ठाण्यातील कोपरी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

Narendr Modi In Mumbai, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई, अंधेरीतील वाहतुकीत बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss