Gandhi Jayanti 2022 : …म्हणून ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला, गांधी जयंती निमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट

Gandhi Jayanti 2022 : …म्हणून ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला, गांधी जयंती निमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे. सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम त्यांना राष्ट्रपिता म्हटले होते. तर रवींद्रनाथ टागोर यांना महात्मा म्हटले होते. महात्मा गांधी यांनी सत्य अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांविरोधात लढा दिला. त्यानंतर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्य मिळाले. आज त्यांची १५३वी जयंती असून, त्यानिमित्ताने संपूर्ण देशात गांधी जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रात देखील काही भागात गांधी जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तर, गांधी बापूंना अभिवादन करण्यासाठी राजकारणांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केलं आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या ट्विटर हँडल वरून एक पोस्ट शेअर केली आहे.

“आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन” असं म्हटलं आहे. तसेच “गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हाताच्या कंकणाला आरसा कशाला?, शेलारांचे शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी म्हटले, “महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही.”

मुंबई विमानतळ उडवून टाकण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

“शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन” असंही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच राज ठाकरे यांनी लाल बहादुर शास्त्री यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. असे म्हणत राज ठाकरे यांनी गांधीजींसह लाल बहादुर शास्त्री यांना देखील आदरांजली वाहिली आहे.

IND VS SA: आज रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी20

Exit mobile version