Friday, July 5, 2024

Latest Posts

“नमामि गोदावरी प्रकल्पाला गती द्या” – आमदार सत्यजीत तांबे

नमामि गंगे तव पादपंकजम् , सुरासुरैर्वंदितदिव्यरूपम्।। भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम् , भावानुसारेण सदा नराणाम् ।।

नमामि गंगे तव पादपंकजम् , सुरासुरैर्वंदितदिव्यरूपम्।।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम् , भावानुसारेण सदा नराणाम् ।।

हा श्लोक सर्वानीच ऐकला असेल. या श्लोकानुसार गंगेला आपण आई मानतो, ती भोग व मुक्ती या दोहोंसाठी ओळखली जाते. जीवनोत्तर मोक्ष मिळतो असे म्हटले जाते. ती मोक्षदायिनी आहे. यासाठी सर्वजण तिला वनदान करतात. तर या गंगेला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे कामसुद्धा भक्तगणनांचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने द्वारे २०१४ मध्ये सांगण्यात आले होते. त्यानुसार हा प्रकल्प कृतीत येऊ लागला. त्यांनतर याच ‘नमामि गंगेच्या’ (Namami Gange) पार्श्वभूमीवर ‘नमामि गोदावरी’ हा प्रकल्प उदयास आला. त्यानंतर हा प्रकल्प काही कारणास्तव स्थगित झाला होता त्याला आता चालना द्यावी असे विचार नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.

पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत असतात. सध्या आ.तांबे (Satyajit Tambe) दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील गोदावरी व उपनद्यांच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. नाशिक येथे २०२६ साली महाकुंभ मेळा होणारा आहे. या महाकुंभ मेळ्याला कोट्यवधी भाविक, साधू, संत, महंत नाशिकला भेट देणार असून नमामि गोदावरी प्रकल्प जलद गतीने राबवण्यात यावा यासाठी आ. सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची दिल्ली येथे भेट घेत निवेदन दिले.

महाराष्ट्रातील अहमदनगरमधील संगमनेर येथील प्रवरा, म्हाळुंगी आणि आधाळा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. या नद्यांचा ‘अमृतवाहिनी नदी पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्प‘ अंतर्गत विकास आणि पुनरुज्जीवन करावे. या नद्यांच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आमदार सत्यजीत तांबेंनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

महाकुंभ मेळ्यास एक-दीड वर्षांचा अवधी शिल्लक असल्याने नमामि गोदावरी (Namami Godavari) प्रकल्पाला गती देण्यात यावी. तसेच उत्तर महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या उपनद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी व नदी पात्र सुशोभिकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील (C.R.Patil) हे उत्तर महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे ते या प्रकल्पाचा विचार करतील आणि जलशक्ती मंत्रालयाच्या योजनांतर्गत आर्थिक मदत करून या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्राधान्य देतील असा विश्वास आ. तांबे यांनी व्यक्त केला.

अमृतवाहिनी नदी पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे :

गोदावरीच्या उपनद्या प्रवरा, म्हाळुंगी आणि आधाळा या नद्यांचा नैसर्गिक प्रवाह सुधारणे, पुनरुज्जीवन करणे, त्याचा वारसा जतन करणे, सार्वजनिक जागा निर्माण करणे, नद्यांच्या संगमावर प्रवेशक्षमता सुधारणे तसेच नद्यांचे प्रदूषण थांबवणे आणि त्यांचे सुशोभीकीकरण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

हे ही वाचा

 MAHARASHTRA ASSEMBLY MANSOON SESSION 2024 : “मतभेद असावेत परंतु मनभेद असू नयेत..” ; आजच्या अधिवेशनातील घटनांवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

“आठवी पास असल्याचा मला अभिमान आहे ..” ; NARENDRA MEHATA यांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss