spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपावर प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं प्रतिउत्तर

Naresh Mhaske On Sushma Andhare  खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोहळ्यासाठी उपस्थित श्री सदस्यांपैकी १४ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Naresh Mhaske On Sushma Andhare : खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोहळ्यासाठी उपस्थित लाखो श्री सदस्यांपैकी १४ सदस्यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार व सडकून टीका केली असून दरम्यान त्यांनी या सोहळ्याचे कॉन्ट्रॅक्ट शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या पार्टनरशिपमध्ये असणाऱ्या लाईट अँड शेड या कंपनीला दिले असल्याचे म्हटले होते. मोठ्या कार्यक्रमाचा अनुभव नसताना याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट का दिले असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला होता. या आरोपानंतर प्रवक्ते नरेश मस्के यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. सुषमा अंधारे यांनी कायम हिंदू देवतांची विटंबना केली, त्यांचे अध्यात्माशी काही घेणं देणं नाही, या दुर्दैवी घटनेनंतर राजकारण करायचं म्हणून आप्पा स्वारी असतील, श्री सदस्य असतील यांना बदनाम करायचं काम त्या करत आहेत. असं म्हणत नरेश म्हस्के यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उचलली जीभ लावली टाळ्याला, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं म्हणत नरेश म्हस्के यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. “लाईट अँड शेड या कंपनीत नरेश म्हस्के पार्टनर आहेत असा आरोप सुषमा अंधारे करतात. सुषमाताई तुम्हाला ज्यांनी माहिती दिली ते तुम्हाला अडचणीत आणण्याकरिता दिलेली आहे. तुम्हाला खोटी माहिती देण्यात आली आहे. लाईट अँड शेड कंपनीची माझा संबंध सिद्ध करून दाखवा तात्काळ मी राजकारणातून निवृत्त होईल नाही तर तुम्ही किंवा तुम्हाला ज्यांनी माहिती दिली त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं” असं नरेश म्हस्के यांनी सुषमा अंधारे यांना ठणकावून सांगितलं आहे.

आपल्या नेत्यांना विचारा आदित्य संवाद, दादरचा दसरा मेळावा आतापर्यंत कोणी केला? राष्ट्रवादीला विचारा पवार साहेबांचा वाढदिवस काही नेत्यांचे कार्यक्रम कोणी केले? आजही कोण करतोय लाईट अँड शेड कंपनीचे ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रम देखील लाईट अँड शेड कंपनीच करते ही मराठी तरुणाची कंपनी आहे. तो मुलगा काम करतो तो ठाण्याचा आहे पण नरेश म्हस्के यांचा त्यात काय संबंध? नरेश मस्के यांचा संबंध असेल राष्ट्रवादी त्यांचे कार्यक्रम का कार्याला देते? असा घणाघात यावेळी प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

सामना म्हणून शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करता तरीसुद्धा त्यांची जाहिरात पहिल्या पानावर छापता तशी पद्धत आहे. सुषमाताई २४ तासांच्या आत आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या आणि ज्यांनी कोणी तुम्हाला आरोप करायला सांगितले त्यांनी सुद्धा राजीनामा द्या असं आवाहन प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

छ. संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येणारं

Rahul Gandhi यांना सुरत कोर्टाने दिला मोठा धक्का, काँग्रेसची हायकोर्टात धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss