सपाचे ‘आझम खान’ यांना चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणात ३ वर्षांची शिक्षा

सपाचे ‘आझम खान’ यांना चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणात ३ वर्षांची शिक्षा

समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांना गुरुवारी न्यायालयाने शिक्षा तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हेट स्पीच प्रकरणी ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे. तसेच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने खान यांचे विधानसभेचे सदस्यत्वदेखील रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि आमदार आझम खान यांना गुरुवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली. आझम खान यांना ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी एक भाषण केलं होत. याच भाषणात त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद करून घेण्यात आली. त्यानंतर खटला उभा राहिला आणि दोन्ही बाजूंची सुनावणी झाली. त्यावरच न्यायालयाने आज आझम खान यांना दोषी ठरवलं आणि आता त्यांना ३ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आझम खान यांना ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी त्यांना याप्रकरणात जामीन मिळू शकतो. त्यांच्याकडे जामीन मिळवण्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे.

आझम खान यांना २ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल आणि त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होईल, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच न्यायालयाने सुमारे १-.३० तास दोन्ही बाजूच म्हणणं ऐकलं, कारण आझम खानच्या वकिलांनी शिक्षा कमीत कमी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले. त्याचवेळी आझमला नियमानुसार मोठी शिक्षा व्हावी, असा प्रयत्न फिर्यादी पक्षाने केला. आता आझम खान यांना हवे असल्यास ते या निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

हे ही वाचा :

काय ती कॉलेज लाईफ, काय त्या मुली, काय ते पोस्टर सगळं कसं ‘एकदम कडक’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version