spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेची पहिली प्रतिक्रिया

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर एकदा नव्हे अनेकदा आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना दिला आला आहे. “ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांच्यासाठी मी सिल्लोडला एक दवाखाना उभारतो. या दवाखान्यात खोक्यांची आठवण येणाऱ्या नेत्यांची डोकी तपासू. त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव उद्योगपती आहेत. मग त्यांना (सुप्रिया सुळे) उद्योगतीचा दर्जा द्यायचा का,” असे सत्तार यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त केला जात आहे. यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा बोलण्याचा उद्देश तो नव्हता,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले. सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर करण्यात आली होती. त्यावर तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. याबाबत औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधतांना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली.

यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही. अब्दुल सत्तार, गुलाबराव आणि रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, बलात्कारी-खुन्यांना सोडा म्हणून रवींद्र चव्हाण भायखळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये बसले होते, गुलाबराव पाटील सुषमा अंधारे यांना नटी बोलतात, सुप्रिया सुळेंसारख्या सुसंस्कृत सुविद्य खासदांराबद्दल सत्तार असं बोलतात. ही तोडफोड नाही कार्यकर्त्यांचा संताप आहे. ते भेटतील तिथे कार्यकर्ते त्यांना झोडून काढतील. सुप्रिया सुळेंनी थांबा सांगितलं तरी थांबणार नाही. हा आमचा सात्विक संताप आहे, हा फक्त सुप्रियाताईच नाही, सर्व महिलांचा अपमान आहे. २४ तास अल्टिमेटम देतोय, माफीवर चालणार नाही, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

हे ही वाचा :

‘हर हर महादेव’ चित्रपटाला सोलापुरात विरोध?

ट्विटर मागोमाग मेटा देखील करणार कर्मचाऱ्यांची कपात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss