ST Bus Strike: माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती, ऐन गणेशोत्सवात नागरीकांना..काय म्हणाल्या Supriya Sule?

ST Bus Strike: माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती, ऐन गणेशोत्सवात नागरीकांना..काय म्हणाल्या Supriya Sule?

आज मंगळवार ३ सप्टेंबरपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणांचा समावेश असून आता राज्यातील एसटी संपामुळे चाकरमान्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हॅन्डलवरून भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करीत आहेत. सर्वसामान्य जनतेला परवडणारे हक्काचे प्रवासाचे साधन म्हणून एसटीला आजही प्राधान्य दिले जाते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. शासनाने या मागण्यांवर तातडीने विचार करुन त्याबाबत निश्चित अशी भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन ऐन गणेशोत्सवात नागरीकांना होणारा त्रास टाळावा.

प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल

एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर आपल्या वेतनाच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मुदत उलटूनही वेतन प्रश्न सोडवला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. एसटी सेवा बंद असल्याने अक्षरशः प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल असून परीक्षेची वेळ असल्याने एसटी बंद असल्याने पेपरला कसे जावे, असा मोठा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता बसेस सोडण्यात आल्या आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या जेणेकरून बस सेवा सुरू होईल अशी मागणी प्रवासीसह विद्यार्थी करत आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये दीर्घ आंदोलन केले होते. त्यावेळी ५४ दिवस बसची चाके थांबली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

सप्तसूर म्युझिकतर्फे खास गणेशोत्सवानिमित्त नवा म्युझिक व्हिडिओ लाँच, यंदाच्या गणेशोत्सवात वाजणार ‘बोल बाप्पा बोल’
OTT Platform वर येणार आहेत ‘या’ नवीन क्राईम थ्रिलर वेब सीरीज…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version