spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“मराठी मुला-मुलींनी व्यवसाय सुरु केला पाहिज असं म्हटलेलं, देश सोडा नाही” ; Raj Thackeray यांनी परदेशातील मराठी मुलांचे केले कौतुक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे विविध घटनांवरून राजकीय वर्तुळ सतत चर्चेचा विषय बनत आहेत. त्याचप्रमाणे यंदाही विधासभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी हातपाय उचलण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं होतं. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोरदार कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. राज ठाकरे मागचे काही दिवस परदेशात होते. अमेरिकेत एकदा ते हॉटेलच्या खाली उभे होते. त्यावेळी शिवलकर तिथे आला, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. राज ठाकरेंनी अमेरिकेत भेटलेल्या या मराठी मुलाचा किस्सा सांगितला तो नक्की वाचा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे रंगशारदा येथे पदाधिकारी मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी अमेरिकेत भेटलेल्या मराठी मुलाचा किस्सा सांगितला. “मी मागचे २०-२५ दिवस परदेशात होतो. अमेरिकेच्या बृह्नमहाराष्ट्र मंडळाने मला तिथे बोलावलेलं. तिथे माझी मुलाखत झाली. तुम्ही पाहिली की नाही मला माहित नाही. परदेशातील सर्व बंधु-भगिनी मला तिथे भेटले” असं राज ठाकरे यांनी सांगितलं. “मी एकदा हॉटलेच्या खाली उभा होतो, कुठेतरी चाललेलो मी. एक मुलगा आला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पाया पडला. मला बोलला साहेब काहीही करुन तुम्ही माझ्या रेस्टॉरंटला आलं पाहिजे. शिवलकर त्याचं नाव. मी म्हटलं बघतो, कसा वेळ मिळतो ते. त्यावर तो म्हणाला, तुम्ही काहीही करुन जेवायला आलच पाहिजे” असं राज यांनी सांगितलं.

राज ठाकरेंना भेटलेल्या त्या शिवलकरने सांगितलं की, “साहेब मी लहानपणी तुमची भाषण ऐकली, त्यापासूनच प्रेरणा घेऊनच मी परदेशात आलो. इथे रेस्टॉरंट सुरु केलं. मी त्याला म्हटलं, अरे मी मराठी मुला-मुलींनी व्यवसाय सुरु केला पाहिज असं म्हटलेलं, देश सोडा नाही. तरीही ही मुलं परदेशात जाऊन व्यवसाय सुरु करतात, स्वत:च अस्तित्व निर्माण करतात. बर वाटतं” “जेव्ह मी शिवलकरच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेव्हा थक्क झालो. ते एसी रेस्टॉरंट १०० लोकांच्या आसन क्षमतेच होतं. बाहेरच्या बाजूला ५० लोकांची आसन क्षमता होती. अधिकृत. त्या हॉटेलमध्ये दीड ते दोन तासांची वेटिंग होती. ४० टक्के लोक परदेशी होते. बर वाटतं हे सर्व पाहून. असंख्य मराठी लोक भेटले. त्यांनी तिथे व्यवसाय सुरु केलेत. अस्तित्व निर्माण करतायत” असं राज ठाकरे म्हणाले.

 “लाडका भाऊ आणि बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष व्यवस्थित चालले असते.” पदाधिकारी मेळाव्यात Raj Thackeray यांनी लागावला टोला

Heavy Rainfal : मुख्यमंत्र्यांनी पूरजन्य परिस्थितीचा घेतला आढावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss