लोकांचे लक्ष महत्त्वाच्या विषयांकडून दुसरीकडे वळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न – अजित पवार

Ajit Pawar : आज सकाळी सहा वाजल्यापासूनच विरोधी पक्ष नेते अजित पवार बारामती मधील विविध विकास कामांचा आढावा घेत आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाचा चर्चेचा विषय राहिले आहेत.

लोकांचे लक्ष महत्त्वाच्या विषयांकडून दुसरीकडे वळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न – अजित पवार

Ajit Pawar : आज सकाळी सहा वाजल्यापासूनच विरोधी पक्ष नेते अजित पवार बारामती मधील विविध विकास कामांचा आढावा घेत आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाचा चर्चेचा विषय राहिले आहेत. अशातच आज पुन्हा एकदा अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं असून राज्य सरकारवर सडकून टीका आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न यावेळी केला. शिंदे फडणवीस सरकार (shinde fadnavis sarkar) अस्तित्वात येऊन आता दहा महिन्यांचा काळ झला आहे. राज्यातील विरोधी पक्ष कायमच वेगवेगळ्या विषयांवर आपला आवज उठवतो आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका आम्ही सभांमधून लोकांच्या समोर ठेवत आहोत.

राज्य सरकारचा अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ४३ मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहीने घेता येतात, सुरुवातीला हे दोघेच मंत्री होते. आता फक्त २० चं मंत्री आहेत. अद्यापही मंत्रिमंडळामध्ये २३ मंत्र्यांचा समावेश केलेला नाही. तर राज्यमंत्री कोणालाही केलं नसल्याच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवलं. सोबतच एकाही महिलेला मंत्री केलं नसल्याची खंत यावेळी अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवली. जे महत्त्वाचं ते सोडून तिसरंच काही तरी विचारायचं बोलायचं. लोकांचे लक्ष महत्त्वाच्या विषयांवर दुसरीकडे वळवण्यासाठी राज्य सरकार असे काहीतरी वेगवेगळे विषय समोर आणत आहे असं पवार यावेळी म्हणाले. सोबतच अमुक नेत्याच्या बोलण्यावर तुमची प्रतिक्रिया काय असा विचारत जाऊ नका तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कुणाच्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधिना देखील यावेळी सल्ला दिला आहे.

हे ही वाचा : 

अवघ्या काही तासांत पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

MPSC च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोशल मिडियावर व्हायरल, ३० एप्रिल पासून MPSC च्या परीक्षा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version