मुख्यमंत्र्यांविषयीचं वक्तव्य भोवलं; खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांविषयीचं वक्तव्य भोवलं; खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात वाद पेटून निघाला आहे. काल निवणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना शिंदे गटाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. शिंदे गटाने केलेल्या आरोपानुसार, खैरे यांनी आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं, असं वक्तव्य केलं आहे. याविरोधातच आता शिंदे गटाकडून खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच काल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवले आहे. दोन्ही गटामध्ये टीकेची झोड उठली आहे. आज आनंद दिघे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना उलटं लटकवलं असते, असे खैरे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून आता शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या खैरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. आता पोलिसांनी चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आज औरंगाबाद येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेत, चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असून, त्यांच्याबद्दल खैरे यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचं शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले होते. त्यामुळे खैरे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जंजाळ यांनी केली. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं- उद्धव ठाकरे य यांची शिंदे गटावर टीका

Uddhav Thackeray : आता बास अति होतंय… म्हणत सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version