spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘BMC वरही भाजप झेंडा फडकवेल’, आदित्य ठाकरेंचे मतदारसंघात येऊन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे वक्तव्य

महाराष्ट्रातील दिग्गजांच्या राजकीय लढाईतही तरुणाईचा प्रवेश होत आहे.आता भारतीय जनता पक्षाने आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य यांच्या वरळी मतदारसंघातील भाजप युवा मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन आज आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे उद्घाटना निमित्त आज वरळी मतदारसंघात पोहोचले आहेत. त्यांच्या हस्ते युवा वॉरियर या शाखेचे उद्घाटन देखील होणार आहे. यावेळी बोलताना तेजस्वी सूर्या यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना डिवचलं. मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केले आहेत, BMC वरही भाजप झेंडा फडकवेल, असं म्हणत तेजस्वी सूर्या यांनी रणशिंग फुंकलं.

हेही वाचा : 

आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील

यावेळी संवाद साधताना तेजस्वी सूर्या म्हणाले की, “सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या तरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आगामी मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, या निवडणुकीत तरुण प्रभावीपणे काम करतील. सत्ता कुठल्या एका कुटुंबाचा हक्क असू शकत नाही. लोकांच्या पाठिंब्याने सत्ता येते, पैशांच्या पाठिंब्याने नाही.” “इथले सगळे तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. तुमचे वडील किंवा कुटुंबातील कोणी मंत्री नाही, असं म्हणत नाव न घेता तेजस्वी सूर्या यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसंच मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केले आहेत, BMC वरही भाजप झेंडा फडकवेल, असं तेजस्वी सूर्या म्हणाले.

भाजपची तयारी सुरु

गेल्या काही काळापासून वरळी, दादर आणि लोअर परळ भागात भाजप राजकीय भूमी शोधत असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान पक्षाचे विशेष लक्ष वरळी भागावर आहे.ऑगस्ट महिन्यात भाजपने जांबूरी मैदानावर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.ऑक्टोबरमध्ये दादरच्या शिवाजी पार्कवर दिवाळी साजरी झाली. यासोबतच भाजपने नवरात्रीदरम्यान चिंचपोकळी येथे मराठी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. तर काही दिवसांपूर्वी वरळीतील जांबोरी मैदानात दीपोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता.

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीनिमित्त फडणवीस दाम्पत्यांनी वारकऱ्यासोबत धरला ठेका ! पहा फोटो

३१ वर्षी तेजस्वी सूर्या हे बंगळुरु दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. विशेष म्हणजे ते भाजपचे सर्वात तरुण खासदार आहेत. २०२० मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर ३१ वर्षीय आदित्य ठाकरे यांनी युवासेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. तर २०१९ मध्ये त्यांनी वरळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आहे. तसंच ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे ते पहिले व्यक्ती ठरले.

Arvind Kejariwal : गुजरातसह दिल्लीत निवडणुकीचा धुरळा, केजरीवाल मोठ्या पेचात

Latest Posts

Don't Miss