अब्दुल सत्तारांच्या औरंगाबाद येथील घरावर दगडफेक

अब्दुल सत्तारांच्या औरंगाबाद येथील घरावर दगडफेक

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. यावर अब्दुल सत्तार भडकले आणि गलिच्छ भाषेत टीका केली. त्यानंतर सत्तार यांच्या औरंगाबादमधील निवास्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक देखील केली. अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद मधील दिल्ली गेट परिसरातील घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यावेळी सात्तार यांच्या घराच्या काचा फोडण्यात आल्या.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झालीय. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं राज्यभर संतापाची लाट उसळलीय. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय.

सत्तार यांच्या औरंगाबादमधील निवास्थानी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. काही कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घराच्या काचेवर दगडफेक देखील केली. यात निवास्थानीच काच फुटली आहे. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवास्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई ठाण्यासह पुणे, नागपूर, बीडमध्ये राष्ट्रवादीची आंदोलन सुरू आहेत.

हे ही वाचा :

सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेची पहिली प्रतिक्रिया

‘हर हर महादेव’ चित्रपटाला सोलापुरात विरोध?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version