spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्र तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवा, १४ पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव

केद्रीय तपास यंत्रणांचा सुरुअसलेला गैरवापर रोखण्याची मागणी करत देशभरातील १४ विरोधी पक्षांनी एकत्र येत मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

केद्रीय तपास यंत्रणांचा सुरुअसलेला गैरवापर रोखण्याची मागणी करत देशभरातील १४ विरोधी पक्षांनी एकत्र येत मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी ८ विरोधी पक्षांच्या ९ नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामांबाबत खंत व्यक्त करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (ठाकरे गट) आम आदमी पार्टी, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, डीएमके आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांचा समावेश आहे. सर्वोच्च सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या याचिकेवर ५ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.

ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधी पक्षांना टार्गेट करत आहे. जर विरोधी पक्षातील कोणताही नेता भाजपमध्ये प्रवेश करतो तर त्याविरोधात सुरु असलेली कारवाई थांबवली जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या यंत्रणांचा गैरवापर रोखावा आणि त्यात होणाऱ्या अटकसत्रासंदर्भातही दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र

जर राज ठाकरे जनतेच्या मनात मुख्यमंत्री आहेत तर मग मी जनतेच्या मनात भारताचा पंतप्रधान, जितेंद्र आव्हाड

Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss