जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन … सामनातून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन … सामनातून संजय राऊतांचा  सरकारवर हल्लाबोल

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) या वृत्तपत्रातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सामनातील रोकठोक मधून सरकारवर टीका करतात. अलीकडेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले होते. त्यावेळेस संजय राऊत हे जम्मू – काश्मीरमध्ये गेले होते. आता संजय राऊत यांनी ते जम्मू – काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असताना त्यांच्याबरोबर घडलेल्या एका घटनेचे वर्णन सामनाच्या रोखठोक मधून करत सरकारवर टीका केली आहे. यावेळेस राऊत यांनी जम्मू मध्ये असलेले काश्मिरी पंडित (Kashmiri Pandits) कोणत्या परिस्थितीतून जात आहे या बद्दल सामनामध्ये सांगितले आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्याबरोबर जम्मूमध्ये घडलेल्या घटनेचे वर्णन सामनामधील रोखठोकमध्ये केले आहे. संजय राऊत यांनी जम्मू – काश्मीर मध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितां संदर्भात लिहिले आहे की “ज्या काश्मिरी पंडितांच्या हत्येचा आणि घरवापसीचा प्रपोगंडा भाजपाने राजकारणासाठी केला ते काश्मिरी पंडित आज नेमक्या कोणत्या स्थितीत जगत आहेत? त्यामागचे सत्य हे आहे की काश्मिरी पंडित आजही भीतीच्याच छायेत आहे. जम्मूत मी उतरलो तेव्हा मला सांगण्यात आलं की काश्मिरी पंडित आणि त्यांची कुटुंबं मोठ्या संख्येने जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन करत आहेत. हे सगळे सरकारी कर्मचारी आहेत.”काश्मीर खोऱ्यात या अधिकाऱ्यांच्या नेमणूक झाल्याचे या लेखात लिहिले आहे की “कश्मिरी पंडित जम्मूत परत आले पण अतिरेकी हे काही ओळखपत्र पाहून गोळ्या घालत नाहीत.”म्हणून हे पंडित लवकरात लवकर त्यांची बदली करण्याची मागणी करत असल्याचे सामनात सांगितले आहे. तर “गेल्या सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही.” असे म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहिले आहे की “राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काश्मीरचे सत्य जनतेसमोर आले आहे. भारत जोडो यात्रेची हेटाळणी मोदी सरकारमधले मंत्री आणि भाजपाने केली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही”. असे लिहीत राऊतांनी सरकारला टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

स्वादिष्ट शीर खुर्मा कसा बनवायचा घ्या जाणून…

तुमच्या मुलांना कुष्ठरोगाची समस्या आहे? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम वाढतोय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version