महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द, मात्र सीमावर्ती भागात कडक पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द, मात्र सीमावर्ती भागात कडक पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्र – कर्नाटक ( Maharashtra-Karnataka border dispute) सीमा वाद दोन्ही राज्यात पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांवर आपला हक्का सांगितल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात पंढरपूर, नांदेड, नाशिक, सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी महाराष्ट्र सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार मात्र एक-एक पाऊल मागे येताना दिसत आहे. सीमाप्रश्न मार्ग काढण्यासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या मंत्र्याचा दौरा आज रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Dr. Babasaheb Ambedkar महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही प्रेरणादायी उदाहरणे पहा

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना बेळगाव दौरा रद्द झालेला असला तरी पोलीस खात्याने बेळगाव जिल्ह्याच्या सगळ्या सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. जो काही निर्णय घेणार आहे ते न्यायालय घेणार आहे. मंत्र्यांना कर्नाटकात जायचे तर ते जाऊ शकतात. त्यांना कुणी रोखू शकणार नाही. मात्र दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. अशा वेळी कोणताही गोंधळ, वाद होणे उचित होणार नाही. काय करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आम्हाला सांगतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News ब्रिटनकडून शिवरायांच्या तलवारीसोबत वाघनखं राज्यात परत येणार

दोन्ही राज्यांमध्ये भाजपचंच सरकार असल्यानं महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून टोकाची भूमिका घेतली जात नसल्याच्या चर्चा रंगल्यात. मात्र, दोन मंत्र्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न -बोम्मई महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावचा दौरा केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे दौऱ्याची ही योग्य वेळ नाही. सीमावाद हा न्यायप्रविष्ट असल्याने तो न्यायालयात सनदशीर मार्गानेच लढावा, असे आवाहन सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.

Mahaparinirvan Din : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीम सैनिकांना चैत्य भूमीवर जाऊन केलं मार्गदर्शन

Exit mobile version