Monday, July 8, 2024

Latest Posts

Vanchit Bahujan Aghadi च्या मागण्यांना यश, कोणत्याही आंदोलनकर्त्याला….CM Shinde काय म्हणाले?

वंचित बहुजन आघाडी (VBA) चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज ५ जुलै २०२४रोजी मुंबईत सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. नागपूर येथील दीक्षाभूमी (Dikshabhumi) वर झालेल्या आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, प्रशासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, तसेच गावातील शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यावर स्टे देण्यात यावा अशा  मागण्यांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी वंचितने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

१. दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केली जाणार नाही.

२. शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

३. अतिक्रमणातील घरे पाडली जाणार नाहीत आणि त्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल.

या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्य करण्यात आल्या आहेत. नागपूरमधील दिक्षाभूमी परिसरात (Dikshabhumi) चालू असलेल्या भूमिगत पार्किंगच्या (Dikshabhumi Underground Parking Project) कामाला आंबेडकरी अनुयायांनी कडाडून विरोध केला होता. हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी परिसरात जोरदार आंदोलन करत बांधकामास विरोध केला होता. याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेतदेखील (Maharashtra Vidhansabha) पडले होते. आंबेडकरी जनतेचा वाढता विरोध आणि रोष पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात दीक्षाभूमीवरील पार्किंगच्या काम स्थगित देत असल्याची घोषणा केली होती. नागपूरमधील दीक्षाभूमी परिसरात वेगवेगळ्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडून २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार भूमिगत पार्किंगचेदेखील काम चालू होते. या प्रकल्पाला मात्र आंबेडकरी जनतेने कडाडून विरोध दर्शवला. विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी यथे लाखो अनुयायी येतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम धोकादायक असल्याचे सांगत हे काम तात्काळ थांबवावे अशी मागणी आंदोलकांनी केली होती. आता या कामाला स्थगिती देण्यात आली असून इतर विकासकामांना आंदोलकांचा विरोध नसल्याचे समजते.

हे ही वाचा:

Maharashtra Monsoon Assembly 2024: ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार, Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss