आपल्या जुन्या संसद भवनातही अशा प्रकारच्या घटना घडल्या – राजनाथ सिंह

विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे.

आपल्या जुन्या संसद भवनातही अशा प्रकारच्या घटना घडल्या – राजनाथ सिंह

बुधवारी लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणाचे तीव्र पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा निवेदन न आल्यामुळे या घटनेच्या दुसऱ्या दिवशीही लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. हा गोंधळ इतका वाढला की कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत तब्बल ३ तासांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. यादरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत या प्रकाराबाबत आपली भूमिका मांडली.

नेमकं काय घडलं बुधवारी लोकसभेत?
लोकसभेत बुधावारी दुपारी कामकाज चालू असताना दोन तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून खासदार बसतात त्या ठिकाणी आले. तिथून हे तरुण वेगाने अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेनं धावत निघाले. यावेळी त्यांनी हातातील स्मोक कँडल फोडून सभागृहात धूर केला. मात्र,

काही खासदारांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणांची वेळीच धरपकड केली. काही खासदारांनी त्यातल्या एका तरुणाला तर चांगलाच चोप दिला. दुसरीकडे संसदेच्या बाहेर एक तरुण व एक महिला घोषणाबाजी देत होते. त्यांनीही स्मोक कँडलचा वापर केल्यामुळे संसद परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.


राजनाथ सिंह यांच्या आवाहनानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही. काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी व गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केलं.

हा प्रकार घडताच सुरक्षारक्षकांनी या चौघांना ताब्यात घेतलं. बुधवारी दिवसभर केलेल्या तपासात या सगळ्या प्रकाराच्या नियोजनात सहभागी असलेल्या आणखी दोघांनाही दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांबरोबरच आयबीही या प्रकाराचा तपास करत आहे.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version