spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : Sudhir Mungantivar यांनी विरोधकांना दिला ‘वाघनखांच्या करारावर’ करारी जवाब..

सुधीर मुनगंटीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० फोटो गॅट व्या राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्त वाघनख महाराष्ट्रात आणायला करार करण्यासाठी जात असल्याचा आनंद आहे तसेच जीवन जगाव कशासाठी जगाव हे महाराजांच्या विचारातून मिळतो हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यासाठी त्यांचा शूर पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारे वाघनखे आहे.

लंडन (London) येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Waghnakhe) लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. परंतु या वाघनखांबाबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (INDRAJEET SAWANT) यांसह अनेक विरोधकांनी ही वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा केला होता. तसेच राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात होता. मात्र या सगळ्या आरोपांवर मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आज विधानसभेत झालेल्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच असल्याचे स्पष्ट केले. पुढील आठवड्यात ही वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत (VIDHAN SABHA)जाहीर केले. त्यासोबत ही वाघनखे भारतात आणण्यासाठी किती रुपयांचा खर्च होणार, यासंदर्भातील माहिती देखील त्यांनी सांगितली आहे.

वाघनखांसाठी एकूण किती कोटींचा खर्च आला ?

  • महाराष्ट्रात वाघनखे आणण्यासाठी तब्बल ७ कोटींचा खर्च झाला असल्याची चर्चा पसरत आहे. मात्र ही खोटी माहिती असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
  • लंडनहून वाघनखे आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे दिले नसून त्यामध्ये केवळ १४ लाख ८ हजारांचा खर्च झाला आहे.
  • या वाघनखांसोबत छत्रपती शिवरायांच्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे व त्यासाठी लागणाऱ्या म्युझियमच्या डागडुजीसाठी आणि नुतनीकरणासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १९ जुलैला हे वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्त वाघनख महाराष्ट्रात आणायला करार करण्यासाठी जात असल्याचा आनंद आहे, मात्र यात कोणी इनपुट तर देतच नाही उलट काही विरोधक खोडा टाकण्याचे काम करत आहे. त्यांना फारसे महत्त्व देत डिली नसल्याचे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले

हा सोहळा नेमका होणार कसा ?

तीन वर्षे हे वाघनख महाराष्ट्रात राहणार आहेत हा करार होत असताना एका शिवभक्ताने तयार केलेला खास पेहराव सुद्धा घालून जाणार आहे ज्यावर हृदयासस्थानी एम्ब्रॉयडरी करून छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर चित्र साकारले आहे. तो पोशाख परिधान करून करार स्वाक्षरी करण्याचा इच्छा शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा आहे. आमच्यासाठी विचारांचा अंधार दूर करणारा वैचारिक सूर्य आहे ३५० व्या राज्याभिषेका निमित्ताने एक कोटी शिवभक्तांचे पोर्टल तयार केले जात आहे त्याच्यावरील काम सुरु झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

CHAMPIONS TROPHY 2025 साठी भारत पाकीस्तानला जाणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss