सीमावादावर सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य

सीमावादावर सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य

सध्या महाराष्ट्र – कर्नाटक (Maharashtra – Karnataka) सीमावाद प्रचंड तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रामधल्या सोलापूर (Solapur) आणि अक्कलकोट (Akkalkot) या गावांवर आपला दावा केला आणि वातवरण तापलं. या वादावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या चुकीचा परिणाम आहे. त्यानंतरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून कर्नाटकच्या सीमेवरील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात यावं अशी मागणी सुरु झाली असल्याची टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

पुढे मुनगंटीवार म्हणाले, सीमावादाचा प्रश्न हा न्यायालयातूनच सुटणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) आपल्याला आपली बाजू मांडावीच लागेल. हा सीमावादाचा न्यायालयाच्या बाहेर सुटण्याचा प्रश्न नाही. सीमाभागातील गावात मराठी भाषिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून त्याचा दुसरा संदर्भ नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकला वाटतंय की त्यांची बाजू मजबूत आहे. मात्र महाराष्ट्राला वाटते की, आमची भूमिका जास्त मजबूत आहे. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकू. अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या (Shri Ram Mandir) प्रकरणातही काँग्रेस (Congress) आणि काही विरोधक म्हणत होते की रामाची काल्पनिक कथा आहे. मात्र आम्हाला वाटायचं की हा विश्वासाचा, आस्थेचा अस्मितेचा मुद्दा आहे, आणि आम्ही जिंकलो. तसंच सीमावादाच्या प्रकरणातही महाराष्ट्र जिंकेल असा विश्वासही यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : 

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version