सत्यजित तांबेंच्या निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया

सत्यजित तांबेंच्या निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रामध्ये सध्या पदवीधर निवडणुकीचे (Graduate Election) वारे जोरात वाहू लागले आहेत. या पदवीधर निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेला मतदार संघ जर खुंटला असेल तर तो म्हणजे नाशिक. सत्यजित तांबेंच्या (Satyajit Tambe) निलंबना नंतर त्यांचे वडील सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुलाला निलंबित केल्यामुळे मी दुखी आणि व्यथित आहे, असं म्हणत सुधीर तांबे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता-पुत्रानी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली होती. त्यामुळे सत्यजीत तांबे यांचं पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबन झालं आहे. पक्षाच्या कारवाईवर पहिल्यांदाच सुधीर तांबे बोलले.इतकी वर्ष काम केलं, मुलाचं निलंबन केलं आहे. मी दुखी आणि व्यथित आहे. आम्ही आमची भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. मी गेल्या १३ वर्षांपासून या मतदारसंघात काम करतोय, आम्ही सदैव लोकांच्या संपर्कात असतो. लोक आमचा विचार करतील आणि आम्हाला न्याय देतील. योग्य वेळी भूमिका मांडणार आहे’ असं तांबे म्हणाले. तसंच, ‘आमची कुणाशीही चर्चा झालेली नाही. आम्ही काही पाठिंबा मागितला नाही, पण पक्षाने ज्या प्रकारे कारवाई केली आहे, त्यामुळे आम्ही दुखी आहोत’ असं म्हणत तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला नसल्याचं सांगितलं.

दरम्यान, निलंबनानंतर सत्यजीत तांबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने केलेल्या कारवाईवर सत्यजीत तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये नियमांची पायामल्ली करून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे, योग्य वेळी मी यावर उत्तर देईन, असं सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे सोडणार का पक्षप्रमुखपद? ठाकरे गटाने घेतला मोठा निर्णय

भगवान राम सीतेसोबत दररोज बसून दारू प्यायचे, के. एस. भगवान यांचं वादग्रस्त विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version