कोल्हापूर मधील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

पूर्ण देशात पसरलेल्या कोरोना संकटचा परिणाम कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांच्या निवडणुकीवर सुद्धा झाला. पण आता ह्या निवडणुकांचं मार्ग मोकळा झाला असून लवकरच ह्या निवडणूक होणार आहे.

कोल्हापूर मधील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

पूर्ण देशात पसरलेल्या कोरोना संकटचा परिणाम कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांच्या निवडणुकीवर सुद्धा झाला. पण आता ह्या निवडणुकांचं मार्ग मोकळा झाला असून लवकरच ह्या निवडणूक होणार आहे. २०२१ १ एप्रिल ते ३१ डिसेंबर आणि २०२२ मधील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर संचाला मंडळाची मुदत संपलेल्या सर्व साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या बाबत यंत्रणाचे कामकाज एक मार्चपासूनच सुरु झाले आहे. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सभासदांच्या आणि संस्था मतदारांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर सहसंचालक ए व्ही गाडे यांनी संबंधीत साखर कारखान्यांना दिले आहे. एकूण १४ साखर कारखान्यांमध्ये ह्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत त्यात कोल्हापूर मधील ७ आणि सांगलीतील ७
साखरकारखान्यांचा समावेश आहे. कोल्हापुरातील भोगावती, बिद्री, हमिदवाडा या प्रमुख साखर कारखान्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री, इंदिरा, गवसे, भोगावती, सोनवडे, सदाशिवराव मंडलिक- हमिदवाडा आणि दूधगंगा-वेदगंगा हे सहकारी साखर कारखाने ह्या निवडणुका घेणार आहेत . तर सांगली जिल्ह्यातील (Sangli) शेतकरी सहकारी साखर कारखाना -कोकळे, क्रांतिअग्रणी- कुंडल, वसंतदादा , नागनाथ अण्णा नायकवडी, सर्वोदय-कारंदवाडी, राजे विजयसिंह -जत आणि यशवंत सहकारी साखर कारखाना-नागेवाडी या साखर कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व साखर कारखान्यांना एक फेब्रुवारी 2023 या अर्हता तारखेवर प्रारूप मतदार याद्या तयार करून पाठवाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. ”अ” वर्ग उत्पादक सभासदांसाठी एक फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख निश्चित करून 31 जानेवारी 2021 रोजी आणि त्यापूर्वीचे सभासद ग्राह्य धरून समावेश करावा आणि त्यानुसार प्रारूप यादी तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. शिवाय ”ब” वर्ग संस्था सभासदासाठी 31 जानेवारी 2020 ही तारीख निश्चित करून त्या दिवशीचे किंवा त्यापूर्वीचे संस्था सभासद निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील 8 आणि सांगली जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम संपला आहे. 20 मार्चपर्यंत दोन्ही जिल्ह्यातील गळीत हंगामाची धुराडी थंड होणार आहे. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा 5 एप्रिल व हुतात्मा कारखाना 15 एप्रिलपर्यंत गळीत हंगाम पूर्ण करतील, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. साखर आयुक्तांनी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गाळप हंगामाचा आढावा घेतला. मार्केट यार्ड येथील सभागृहात दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालकांची बैठक झाली

हे ही वाचा :

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

ठामपाच्यावतीने गरजू महिलांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ सुरू करावी शिवसेनेची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Exit mobile version